ताडोबातील वन्य प्राण्यांचा मासळ परिसरातील शेतशिवारात हौदास…!

- शेत पिकांचे प्रचंड नुकसान - शेतकरी चिंतेत

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

16

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

चिमूर – शेतपिकावर रोगराई नापिकी व दुष्काळामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे अशातच रब्बी हंगामात पिके बहरून काढनीवर येत असतानाच अनेक दिवसापासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राणी मासळ परिसरातील शेतशिवारात शिरकाव करत पिकांवर हौदास घालत आहे आज पर्यत बऱ्याच पिकांची वन्य प्रान्यांनी प्रचंड नुकसान केली आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन मासळ परिसरातील नागरीकांची शेती आहे. या परिसरातील नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे शेतकरी पोटाच्या भाकरीसाठी शेतीत रात्रीचा दिवस करत राबराब राबत आहे मात्र परिसरातील बाम्हणगाव सातारा कोलारा टेकेपार मासळ देवळी मदनापूर करबडा नंदारा विहीरगाव गोंडमोहाळी येथील शेतकर्‍यांच्या शेतातील उभ्या पिकांवर वन्य प्राणी डल्ला मारत हौदास घालत नासाडी करत असल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहे या वन्य प्राण्याचा उच्छाद केव्हा थांबनार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नंदारा परिसरात वाघाचे दर्शन –
नदी काठावर वसलेल गाव मासळ पासून दोन किमी अंतरावर आहे या गावाला झाडाझुडपाने विळखा घातला आहे त्यामुळे अनेक वन्य प्रान्यासह वाघाचे हमखास दर्शन होते त्यामुळे नागरीकांचे शेतावर जाने कठीण झाले आहे मात्र या परिसरात जिवीत हानी होन्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे वन विभागाने लक्ष देन्याची गरज आहे

मासळ गावाचा समावेश बफर झोन मध्ये करा –
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मासळ परिसरातील शेतकऱ्यांची शेती बफर झोन मध्ये आहे त्यानांच वन विभागाच्या योजनेचा लाभ मिळतो गावातील इतर शेतकरी नागरीकांना योजनेचा लाभ मिळत नाही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प घोषीत होन्यापूर्वी पासुनच अनेकदा ग्राम पंचायत मासळ कडून इतर शेतकरी नागरीकांना योजने चा लाभ व मासळ गावाचा समावेश बफर झोन मध्ये करावा यासाठी अनेकदा वनविभाग प्रशासनाला पत्र व्यव्हार पाठपुरावा प्रस्ताव पाठवीला मात्र प्रस्ताव कुठे अडकुन पडला समजन्या पलीकडे आहे त्यामुळे संपूर्ण मासळ गावचा समावेश बफर झोन मध्ये करा अशी मागणी गावकर्यांकडून होत आहे.

 

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा