“राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते?” नारायण राणेंनी जहरी टीका

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

4

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ काल कणकवलीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी भाजप नेते नारायण राणे बोलत होते. केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. पण काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार, अशी जोरदार टीका नारायण राणे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदींचा नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे तर देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे. आमच्या शेतकऱ्याला सबळ बनवले पाहिजे, आर्थिक समृद्ध बनवले पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे म्हणून त्यांना कृषी कायदे आणले असल्याचे नारायण राणे यांनी म्हणले आहे.

दरम्यान, दिल्ली आणि अन्य ठिकाणी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत. असे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा