बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात

लग्नासाठी अलिबागला रवाना होत असताना झाला वरुणच्या गाडीला अपघात

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

24

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात झाला आहे. शनिवारी वरुण त्याच्या लग्नासाठी जुहूवरुन अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र, याचवेळी वाटेत त्याच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु, लग्नाला जाण्यापूर्वीच हा अपघात झाल्यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

वरुण धवन आज ( २४ जानेवारी) त्याची प्रेयसी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी वरुण आणि नताशाच्या घरातली मंडळी शुक्रवारीच अलिबागला पोहोचले होते. मात्र, काही कारणास्तव वरुणला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो २३ तारखेला त्याच्या कारने अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. याचवेळी वाहतूक कोंडीत सापडलेल्या वरुणच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्याच्या गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे. मात्र, वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही.

अलिबागमधील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे वरुण आणि नताशा लग्नगाठ बांधणार आहेत. अगदी मोजक्या पाहुण्यांनाच या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. या लग्नसोहळ्यात केवळ ५० जणांनाच आमंत्रण देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या लग्नसोहळ्यात कलाविश्वातील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर असे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा