‘या’ वेळेमध्ये नका वापरू Google Pay-PhonePe सारखे UPI अ‍ॅप्स, NPCI ने दिली महत्त्वाची माहिती

"पुढील काही दिवस जाणवणार समस्या, युजर्सनी त्यानुसार करावं UPI व्यवहारांचं नियोजन"

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

97

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. पेटीएम, गुगल पे, फोन पे यांसारख्या अनेक UPI अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. जर तुम्हीही ऑनलाइन पेमेंटसाठी UPI चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) पुढील काही दिवस युपीआय पेमेंटमध्ये समस्या जाणवू शकते अशी महत्त्वाची माहिती युजर्सना दिली आहे. रात्री १ ते ३ वाजेदरम्यान युपीआय पेमेंटच्या सेवेमध्ये समस्या जाणवू शकते… पुढील काही दिवस ही समस्या जाणवेल…ग्राहकांनी त्यानुसार युपीआय व्यवहारांचं नियोजन करावं असं NPCI ने सांगितलंय. यादरम्यान सिस्टिम अपग्रेडचं काम केलं जाणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलंय. ट्विटरद्वारे NPCI ने ही माहिती दिली आहे.

ही समस्या किती दिवस जाणवेल हे मात्र नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने सांगितलेलं नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी नव्या वर्षापासून UPI व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र त्यात कोणतंही तथ्य नसून चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि सहजसोप्या पद्धतीने UPI व्यवहार सुरू ठेवा, कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे स्पष्टीकरण NPCI ने दिले होते.

 

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा