राष्ट्रगीत सुरू असताना ‘या’ खेळाडूला अश्रू झाले अनावर; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान वायरल

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

6

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

सिडनी : आपल्या देशाचे राष्ट्रगीत ऐकताना किंवा म्हणताना अंगावर रोमांच आले नाही तर नवलंच! असंच काहीसे भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या बाबतीत घडले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी राष्ट्रगीत सुरु असताना मोहम्मद सिराज अतिशय भावुक झाला आणि त्याला त्याचे अश्रू झाले.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून झाली. मात्र त्याआधी टीम इंडिया काही दिवस ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन होती. या दरम्यान मोहम्मद सिराजच्या वडिलांचे हैदराबादमध्ये निधन झाले. क्वारंटाईन असल्याने सिराजला वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते.

मात्र राष्ट्रगीतादरम्यान मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले आणि त्याला रडू कोसळले. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटीझन्सनी या व्हिडीओला भावनिक दाद दिली आहे.

दरम्यान, वडिलांच्या आठवणीत सिराज भावूक झाला असावा, असेही क्रिकेट चाहत्यांकडून म्हणले जात आहे.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा