” वृक्ष सवंर्धन करा ” हा संदेश देत शिक्षक सेनेच्यावतीने वृक्षभेट देण्याचा उपक्रम सातत्याने सुरू

शिक्षक सेनेच्या उपाध्यक्षा रजनीताई धारपवार यांना वस्तूभेट ऐवजी दीर्घायुष्य असलेले वृक्ष वाढदिवसानिमित्त भेट

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

6

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

शेगांव  :  माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारे निसर्गाचे देणे म्हणजे वृक्ष आहे म्हणून वृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे. याची जाण ठेवून प्रत्येकाने फक्त वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन करून त्यांचे पालन व संरक्षण करणे यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे.
शिक्षक सेनेच्या उपाध्यक्षा यांना याच सामाजिक जाणीवेतून व वृक्षाची लागवड करण्याच्या व पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उदात्त हेतुने दीर्घायुष्य असलेल्या वृक्षाची भेट देऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला व वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले आहे.
शिक्षक सेनेचे पदाधिकारी व शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त एका दीर्घायुष्य असलेल्या वृक्षाची सात्यत्याने वर्षभर वृक्षारोपण करण्याचा उपक्रम शिक्षक सेनेच्यावतीने वर्षभर यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
याप्रसंगी शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष सुनिल घावट,किशोर मोरे, महिला संघटक सुषमा खेडकर, कार्यकारिणी सदस्य सचिन वडाळ,अंनतराव तराळे आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा