“…तर जयंतरावांना ईश्वराला शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य मागावं लागेल”

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

22

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

चंद्रपूर : “जयंत पाटलांची (Jayant Patil) मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटत नाही. पवार साहेबांचंच कुटुंब फार मोठं आहे. या कुटुंबाला संधी देता-देता जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल,” अशी उपरोधिक टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. ते चंद्रपूरमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. ईस्लामपूरमध्ये बोलताना जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच दिवास्वप्न नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. जयंत पाटलांच्या याच विधानावर सुधीर मुनगंटीवार यांनी वरील प्रतिक्रिया दिली. (Sudhir Mungantiwar comment on Jayant Patil desire of becoming chief minister)

जयंत पाटील काय म्हणाले?

दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे ते पद नाही. प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि खासदार शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं आपण म्हटल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

माझ्या विधानाची मोडतोड केली

दरम्यान जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रकट केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच. त्यांनी ट्विट करत असे वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं आहे. माझ्या विधानाची मोडतोड करुन दिशाभूल केल्याचं त्यांनी त्यांनी म्हटलं आहे.

अतुल भातखळकरांची खोचक टीका

जयंत पाटिल यांच्याविषयीचे हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच भाजप नेते अतुल भातखळकर यांनीसुद्धा राष्ट्रवादीवर खोचक टिप्पणी केली. आता महाविकास आघाडीत फक्त युवा आमदार रोहित पवार यांनाच मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडायचे बाकी आहे, अशी खोचक  टीप्पणी केली होती.

 

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा