42 दिवसाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ग्रीन झोन असलेल्या वर्ध्यात ‘लालपरी’धावल्याने प्रवाशी आनंदीत

9

रस्त्यावरून बस धावू लागल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंदही ओसंडून वाहत आहे.

वर्धा | देशात 24 मार्चला लॉकडाऊनची घोषणा करताच ग्रामिण भागातील गोरगरीब लोकांची जिवनवाहिनी असलेली लालपरीही होम क्वारंटाईन झाली होती. आता सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्ध्यातिल हिंगणघाट शहरासह ग्रामिण भागात तब्बल 42 दिवसाच्या दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यातील रस्त्यावर लालपरी धावायला लागल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी या बस चालक वाहकाच स्वागतही करण्यात येत आहे.

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याअंतर्गत ग्रामीण भागात एस टी परिवहन सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता 42 दिवसांनंतर जिल्ह्यातील सडकावर लालपरीची चाके फिरायला लागली आहे. मात्र शासनाकडून लालपरीत प्रवासी वाहतुकीसाठी काही निर्बंध घातले असुन यात बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी घेता येणार नाही. या बसमध्ये गर्भवति महिला, 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक व दहा वर्षा खालील मुलाना प्रवास करता येणार नाही. यामुळे मोजक्याच प्रवाशांना घेऊन लालपरी रस्त्यावर फिरत आहे. 42 दिवसानंतर ही लालपरी सुरू झाल्याने तो आज कुतूहलाचा विषय राहिला आहे. रस्त्यावरून बस धावू लागल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंदही ओसंडून वाहत आहे.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा