…तर पेट्रोल, डिझेलसह भाज्यांचेही दर वाढणार, जाणून घ्या कारण

कोरोना संकट काळात देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात स्थिरता होती. मात्र, आता पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे (Saudi Arabia to cut oil output in February and march commodities cost may rise)

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

12

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मुंबई : कोरोना संकट काळात देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात स्थिरता होती. मात्र, आता पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. कारण भारताला कच्चे तेल पुरवणारा सौदी अरेबिया देश तेलाच्या वितरणात घट करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम मागणी आणि वितरणाच्या साखळीवर पडू शकते. कच्च्या तेलाच्या वितरणात घट झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यात पडू शकतो. कारण महागाई वाढू शकते (Saudi Arabia to cut oil output in February and march commodities cost may rise).

कोरोना संकट काळात कच्च्या तेलाच्या मागणीत स्थिरता होती. भारतासह इतर देशांमध्येही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, आता सौदी अरेबियाच्या एका निर्णयाने भारतासह इतर देशांमध्येही महागाई वाढू शकते. सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वितरणात मोठा फटका बसू शकतो.

महागाई कशी वाढणार?

सौदी अरेबिया देश कच्च्या तेलाच्या वितरणात घट करु शकतो. त्यामुळे फेब्रुवारीपासून तेलाच्या दरात वाढ होऊ शकते. तेलाचे दर वाढल्यानंतर परिवहन क्षेत्राला याचा मोठा फटका बसू शकतो. त्याचबरोबर महागाईदेखील वाढू शकते. कारण ट्रान्सपोर्टचा खर्च वाढल्यास त्याचा थेट परिणाम इतर उत्पादनांवर पडू शकतो. त्यामुळे महागाई वाढू शकते. विशेष म्हणजे भाज्यांचे दर वाढू शकतात.

कोरोना संकट काळात भाज्यांचे दर स्थिर आहेत. कांदा आणि टोमॅटोचे दर सोडले तर इतर सर्व भाज्यांचे दर सध्या स्थिर आहे. तेलच्या वितरणात घट झाल्यास भाज्यांच्या किंमतीवर त्याचा थेट परिणाम पडू शकतो (Saudi Arabia to cut oil output in February and march commodities cost may rise).

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा