48 आणि 64 सोडाच थेट 600 मेगापिक्सेल कॅमेरा, या कंपनीच्या फोनची डिझाइन लीक

टेक जगतातील सर्वात मोठी कंपनी सॅमसंग (Samsung) 600 मेगापिक्सल कॅमेरा सेंसरवर काम करीत आहे.

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

32

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मुंबई  : आतापर्यंत आपण स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सेल, 64 मेगापिक्सेल आणि 108 मेगापिक्सल सारखे हाय-टेक कॅमेरे पाहिले आहेत, पण आता टेक जगतातील दिग्गज कंपनी सॅमसंग (Samsung) 600 मेगापिक्सल कॅमेरा सेंसरवर काम करीत आहे. IceUniverse या टिप्सटरनी tweet करत ही माहिती दिली आहे. त्यानी लिहिलं आहे की साऊथ कोरियन टेक्नॉलॉजी कंपनी 600MP सेन्सररवर काम करीत आहे. त्यासोबत टिप्सटरनी फोटोसुद्धा शेअर केला आहे, जो एखादया कंपनीचा प्रेझेंटेशनचा भाग आहे किंवा कंपनीचं डॉक्युमेंट आहे.

यामध्ये सांगितले आहे की, सॅमसंग 600 मेगापिक्सल सेंसर (iscoell 600 MP) वर काम करीत आहे, कारण आता 4K आणि 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगचा ट्रेंड पॉप्युलर होणार आहे. मोठ्या कॅमेरा सेंन्सरने व्हिडीओ झूम केल्यावर त्याची क्वालिटी खराब होत नाही आणि अशा प्रकारे 4K आणि 8K रेकॉर्डिंग बनवले जातात, जेणेकरून व्हिडीओ क्वालिटी उत्तम राहू शकेल. शेअर केलेलं tweet असं आहे, ISOCELL हे सोल्यूशन आहे. झूम, 4K आणि 8K व्हिडिओंच्या ट्रेंडमुळे सेन्सरचं रिझोल्यूशन वाढत आहे. ISOCELL मुळे कॅमेरा बम्पचा प्रश्न मोडीत निघेल.

600 मेगापिक्सेल कॅमेरा स्मार्ट फोनवर जास्त जागा घेईल. Tweet सोबत दिलेल्या फोटो नुसार |soce|| कॅमेरा बंपसारख्या तक्रारी राहणार नाहीत. यादरम्यान कंपनीने यावर काम करायला सुरुवात केली आहे, सेंसरवाले स्मार्टफोन यायला अजून वेळ लागू शकतो. कंपनीचं संशोधन सुरू झालं आहे.

सॅमसंग बंद करणार या फोनची विक्री

सॅमसंग पुढच्या वर्षी साल 2021 पासून आपले प्रीमियम फोन गॅलेक्सी नोट बंद करण्याचा विचार करीत आहेत. खूप दिवस याविषयी चर्चा चालू होती, नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार ही गोष्ट उघड झाली आहे की कंपनी गॅलेक्सी नोट (Galaxy Note) सिरीज बंद करीत आहे. रिपोर्टमधून समोर आले की, कोरोना व्हायरस जागतिक महामारीमुळे हाय-एंड स्मार्ट फोनची मागणी झपाट्याने कमी होत आहे, यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पण कंपनीने याबाबत कोणतीही ऑफिशिअल माहिती दिलेली नाही.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा