चंद्रपूरमधील रुग्णालयाचा कारभारही ‘राम भरोसे’, 2016 पासून अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे उघड

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

7

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

चंद्रपूर : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालायला लागलेल्या आगीत तब्बल 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्यांनतर आता आणखी एका जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाचा ढिसाळ कारभास समोर आला आहे. चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात मागील 4 वर्षांपासून म्हणजेच 2016 पासून अग्निरोधक यंत्रणाच नसल्याचे समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाने 2016 पासून अग्नीरोधक यंत्रणा लावण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला अजूनही मान्यता मिळालेली नाहीये. (no fire extinguisher system in Chandrapur civil hospital) नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 9 जानेवारी रोजी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला आग लागून तब्बल 10 बालकांचा मृत्यू झाला. अग्निरोधक यंत्रणा नसल्यामुळे रुग्णालयाला लागलेली आग वेळेत विझवता आली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय. त्यानंतर आता चंद्रपूरच्या जिल्हा राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण केले जात आहेत. चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा