निलेश राणे vs विनायक राऊत | आम्ही स्वयंभू, आम्हाला ठाकरे सरकारची गरज नाही, निलेश राणेंचा घणाघात

खासदार विनायक राऊतांच्या आरोपाला माजी खासदार निलेश राणेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

6

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

रत्नागिरी : खासदार विनायक राऊतांच्या आरोपाला माजी खासदार निलेश राणेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे (Nilesh Rane Vs Vinayak Raut). “नारायण राणे मंत्री असताना शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांची कामं घेवून भेटायला यायचे. बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात सुद्धा नारायण राणेंना फोन केला होता”, असा गौप्य स्फोट माजी खासदार निलेश राणेंनी केला आहे (Nilesh Rane Vs Vinayak Raut).

“मिलिंद नार्वेकरांपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत सर्व शिवसेनेचे नते भेटायला यायचे, याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. आता जे मंत्री आहेत, ते राणे साहेबांकडे उद्धव ठाकरेंची किती कामे घेवून यायचे त्याची माहिती आमच्याकडे सुद्धा आहेत. बंद खोलीत कुणाला फोन करायची गरज नाही. त्यामुळे विनायक राऊतांनी उड्या मारु नयेत. आम्ही स्वयंभू आहोत, त्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारची गरज नाही”, असा घणाघात निलेश राणेंनी केला.

“विनायक राऊत यांना चागले ते दिसत नाही. मेडिकल कॉलेजची परवानगी मिळते. मेडिकल काऊंसील ऑफ इंडियाकडून परवानगी येते. मेडिकल कॉलेलच्या जमीनसाठी आम्ही प्रायव्हेट कर्ज घेतलंय. त्यावर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेज इथल्या परवानगीसाठी राज्य सरकारची गरज नाही. त्यामुळे शिवसेनेचा पोटात का दुखतंय?”, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी केली.

विनायक राऊतांना कोकणात राणेंवर भुंकायला पाठवलाय – निलेश राणे

“ही जमीन सरकारची प्रायव्हेट आहे. त्यामुळे विनायक राऊतांना कोकणात राणेंवर भुंकायला पाठवलाय. विनायक राऊत मातोश्रींवरचा टॉमी लोकांची सेवा करणे ही त्यांची ड्युटी आणि त्या बक्षिसासाठी विनायक राऊत बोलतात. ग्रामपंचायतीची निवडणूक आणि आरोप राणेंवर त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत पातळीवर काही बोलले नाहीत”, असंही ते म्हणाले.

“2014 ते 2019 या कालावधीत गृहराज्यमंत्री पद दिपक केसरकर यांच्याकडे होते. त्यावेळी का नाही केल्या केसेस ओपन. त्यामुळे राणेंच्या बदनामीचा अजेंडा आहे. विनायक राऊत यांचा मुलगा वाया गेलाय त्यामुळे दुसऱ्यांची वाईट आपला चांगला होत नाही ना. मग, दुसऱ्यांवर टीका करा, हेच विनायक राऊतांचे ध्येय आहे”, असं म्हणत त्यांनी विनायक राऊतांवर टीका केली (Nilesh Rane Vs Vinayak Raut).

काय म्हणाले होते विनायक राऊत?

नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा सल्लाही विनायक राऊत यांनी राणेंना दिला होता.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा