Driving License | ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही! ‘या’ सोप्या पद्धतीने करा अर्ज…

18 वर्ष पूर्ण झाली की, लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. यासाठी भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची ऑनलाईन प्रक्रिया अजूनही बर्‍याच लोकांना माहिती नाही.

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

9

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मुंबई : जर तुमच्याकडे दुचाकी म्हणजेच बाईक किंवा स्कूटर असेल, किंवा चारचाकी वाहन असेल तर, विना परवाना वाहन चालवणे बेकायदेशीर आहे, हा नियम आपल्याला माहित असेल. वाहन चालवण्याचा परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्सचा ओळखपत्र म्हणून देखील वापर केला जातो. 18 वर्ष पूर्ण झाली की, लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. यासाठी भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची ऑनलाईन प्रक्रिया अजूनही बर्‍याच लोकांना माहिती नाही (New Driving License application online process).

बर्‍याच लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स तर हवे असतात, परंतु त्यासाठी त्यांना रांगेत उभे राहायचे नसते. अशा परिस्थितीत, आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा सोपा मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रथम, ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना लागणाऱ्या कागदपत्रांची यादी पाहूया…

ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कागदपत्रे

आपल्याकडे स्थायी पत्त्यासाठी मतदार कार्ड, आधार कार्ड, विजेचे बिल, टेलिफोन बिल, रेशन कार्ड किंवा सरकारी कर्मचार्‍यांनी दिलेले कोणतीही ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यानंतर, आपल्या वयाच्या पुराव्यासाठी, आपल्याकडे दहावी बोर्डाची आवश्यक गुणपत्रिका, जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड असले पाहिजे. जर, ही कागदपत्रे आपल्याकडे नसतील तर दंडाधिकाऱ्यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांच्या मदतीने आपण ऑनलाईन वाहन परवान्यासाठी अर्ज करू शकता.

ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना

 1. ऑनलाइन ड्रायव्हिंग परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधी मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://morth.nic.in/ भेट द्यावी लागेल.
 2. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्याचा पर्याय दिसेल.
 3. नंतर आपण तेथे नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच्या दुव्यावर क्लिक करावे (New Driving License application online process).
 4. त्यानंतर, आपल्यासमोर ड्रायव्हिंग लायसन्सचा फॉर्म उघडेल. येथे मागितलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा.
 5. त्यानंतर आता ऑनलाईन अर्जासाठी फी जमा करावी लागेल.
 6. अर्ज पूर्ण झाल्यावर आपल्याला नोंदणी क्रमांक देण्यात येईल. येथून पुढची प्रक्रिया सुरू होईल.

ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतरची प्रक्रिया :

 1. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी बोलावण्यात येईल.
 2. या ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला त्या अधिकाऱ्यांसमोर हजर असणे आवश्यक आहे.
 3. येथे तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकी वाहन, ज्या वाहनसाठी तुम्ही अर्ज केला आहे ते वाहन चालवून दाखवावे लागेल.
 4. चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करून ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल.
 5. त्यानंतर, मोटार वाहन निरीक्षक आपल्या ड्रायव्हिंग चाचणीचा निर्णय घेतील.

आपल्याला उत्तीर्ण घोषित केल्यास आपल्या अर्जास पूर्ण मान्यता दिली जाईल आणि पुढील काही दिवसांत आपल्याला वाहन चालवण्याचा परवाना दिला जाईल.

(New Driving License application online process)

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा