Twitter ला टक्कर देणार स्वदेशी Tooter; पाहा काय आहे खास

Tooter प्रमोट केल्यावर मिळणार पैसे.. पाहा कसं?

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

31

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Twitter ला टक्कर देण्यासाठी स्वदेशी Tooter सज्ज झालं आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटवर Tooter बाबात युझर्सची निरनिराळी मतं पाहायला मिळत आहेत. काही युझर्सनं Tooter हे ट्विटरची कॉपी असल्यातं म्बचलं आहे. तर काही युझर्सनं हे अॅप स्वदेशी असल्याचं सांगत त्यावर खातं उघडण्याचा सल्लाही दिला आहे. Tooter ची कलर स्कीम आणि स्टाईलदेखील ट्विटरप्रमाणेच आहे.

Tooter नं हे अॅप भारतातच तयार केल्याचा दावा केला आहे. “भारताचं स्वत:चं असं स्वदेशी सोशल नेटवर्क असावं असं आम्हाला वाटतं. याशिवाय आम्ही अमेरिकन ट्विटर इंडियाचे डिजिटल कॉलोनी आहोत. ही ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा वेगळी नाही. Tooter आमचं स्वदेशी आंदोलन २.० आहे.” असं Tooter ने आपल्या अबाऊट सेक्शनमध्ये नमूद केलं आहे.

Tooter Pvt. Ltd. चे नंदा हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचं देखील ट्विटरवर खातं आहे. जर कोणत्याही ट्विटर युझरचे फॉलोअर्स ५ हजार पेक्षा जास्त असतील त्यांना Tooter प्रमोट करून पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे. Tooter च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या बायोमध्ये आपला ईमेल आयडीदेखील दिला आहे. प्रमोट करण्यासाठी त्या ईमेल आयडीवर संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. Tooter वेबसाईटनुसार हा प्लॅटफॉर्म ओपन सोर्स आहे आणि Mastodon प्रोजेक्टकडून इन्स्पायर्ड असल्याचं म्हटलं जात आहे.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा