कधी होणार IPL च्या चौदाव्या हंगामीची सुरूवात?; सौरव गांगुली यांनी दिली महत्त्वाची माहिती

वाचा केव्हा आणि कुठे होणार IPL 2021 चं आयोजन

28

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेली आयपीएल २०२० ही स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. मंगळवारी म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. परंतु त्यापूर्वीच आता आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे वेध लागले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर्षी आयपीएल स्पर्धाही उशिरा सुरू झाल्यानं बीसीसीआयला आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीसाठी वेळ मिळाला नाही. परंतु या स्पर्धेच्या आयोजनाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हे सामने कुठे खेळवले जाणार आणि याव्यतिरिक्त भारतीय संघ कोणत्या संघांबरोबर सामने खेळणार याबाबत माहिती दिली आहे.

पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती सौरव गांगुली यांनी दिली. इंडिया टुडेशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. याव्यतिरिक्त आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन परदेशात नाही तर भारतातच केलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आयपीएलच्या पुढील हंगामाबाबत करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

आयपीएल व्यतिरिक्त रणजी सामने आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचंही आयोजन भारतात केलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच यासाठी आवश्यक ती सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. तसंच पुढील वर्षी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत हे सामने आयोजित करण्य़ात येणार असल्याचंही गांगुली म्हणाले. दरम्यान, यापूर्वी करोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या तेराव्या हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. यावरही त्यांनी भाष्य केलं. “आयपीएलच्या आयोजनात अनेक समस्या आल्या असल्या तरी चांगला खेळ खेळला गेला. आम्ही अन्य टी-२० लीगचाही सन्मान करतो. आयपीएलच्या यशामागे प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याशिवाय हे अशक्यच होतं,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा