IND vs AUS : सिडनी कसोटीआधी खास आकडेवारी, पाहा कोणाचा राहिलाय दबदबा

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

8

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा सामना अखेर सिडनी येथेच होणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. हा सामना सिडनीच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ७ जानेवारीला सुरु होईल. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांनी ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांपैकी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. त्यामुळे सध्या मालिका १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे सिडनी कसोटी जिंकून मालिकेत भक्कम आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करणार आहेत.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडबद्दल खास आकडेवारी –

– या मैदानात आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १२ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील ५ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर १ सामना भारताने जिंकला आहे. तसेच ६ सामना अनिर्णित राहिले आहेत.

– ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सिडनीमध्ये सर्वात मोठा विजय १९९९-२००० साली मिळवला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता.

– ऑस्ट्रेलियाने या मैदानावर भारताविरुद्ध ३ वेळा डावाने विजय मिळवला आहे.

– भारताने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव विजय १९७८ साली मिळवला होता. त्यावेळी बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने १ डाव आणि २ धावांनी विजय मिळवला होता.

– या मैदानात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ५ कसोटी सामन्यात ७८५ धावा केल्या आहेत. सचिनने याच मैदानात २००४ ला २४१ धावांची खेळी केली होती. या मैदानावर भारतीय खेळाडूने केलेली ही सर्वोच्च खेळी देखील आहे.

– या मैदानावर सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने २०१९ मध्ये १९३ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर रवि शास्त्री आहेत. त्यांनी १९९२ ला २०६ धावांची खेळी या मैदानात केली होती.

– या मैदानावर भारताकडून सर्वाधिक विकेट्स अनिल कुंबळेने घेतल्या आहेत. त्याने २० विकेट्स घेतल्या आहेत. सध्या संघात असलेल्या खेळाडूंपैकी आर अश्विन आणि कुलदीप यादवने प्रत्येकी ५ विकेट्स या मैदानावर घेतल्या आहेत.

– या मैदानावर भारताविरुद्ध सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाकडून रिकी पाँटिंगने केल्या आहेत. त्याने ४ सामन्यात ४०३ धावा केल्या आहे. त्याचबरोबर सध्या ऑस्ट्रेलिया संघात असलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरने या मैदानावर प्रत्येकी १ शतक भारताविरुद्ध झळकावले आहे.

– साल २०१९ ला रिषभ पंतने या मैदानावर यष्टीरक्षक म्हणून सर्वोच्च धावांची खेळी केली होती. त्याने नाबाद १५९ धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे १५० पेक्षा अधिक धावांची खेळी या मैदानावर करणारा तो एकमेव यष्टीरक्षक आहे.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा