भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका संकटात

द. ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रकोप : खेळाडूंना न्यू साऊथ वेल्सला हलविण्याची योजना

33

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. 

सिडनी : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. येत्या २७ तारखेपासून उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होईल. त्यानंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. डिसेंबरमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्याआधीच भारतीय दौऱ्यातील कसोटी मालिकेवर संशयाचे ढग घोंघावू लागले आहेत.

पहिली कसोटी १७ डिसेंबरपासून ॲडिलेड येथे सुरू होईल, पण येथे कोरोना बाधितांची संख्या संख्या वाढली आहे. पूर्व ऑस्ट्रेलिया आणि तास्मानिया या संघांदरम्यान काही दिवसाआधी ॲडिलेडमध्ये शेफिल्ड शील्डचा सामना झाला होता. सामन्यात खेळलेल्या सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. स्थानिक सरकारने प. ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलॅन्ड आणि तास्मानिया राज्याच्या सीमा सील केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन सध्या तस्मानिया येथे आहे. तर युवा फलंदाज कॅमरन ग्रीन पर्थ (पूर्व ऑस्ट्रेलिया) येथे आहे. २७ नोव्हेंबरच्या आधी म्हणजेच पहिल्या वनडेआधी हे दोघे ही सिडनीमध्ये दाखल होतील,अशी आशा आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया ॲडिलेड येथील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भारताच्या दौऱ्यात सुरुवातीच्या कार्यक्रमात आधीच बदल केले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्स याने ,‘क्रिकेट बोर्ड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात आहेत,’ असे सांगितले.

खेळाडूंना हवाई मार्गाने आणण्याची योजना

भारताविरुद्धची महत्त्वाची मालिका वाचविण्यासाठी सीए यजमान संघातील खेळाडूंना न्यू साऊथ वेल्स येथे हलविण्याची योजना आखली आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया अ संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना न्यू साऊथवेल्स मार्गे सिडनीला कसे आणता येईल, यावर मंथन सुरू आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार आयोजक, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना हवाई मार्गाने आणण्याची योजना आहे. जैव सुरक्षा पथक आणि संचालन समितीची परिस्थितीवर नजर आहे. आगामी सत्रात खेळाडू, कोचेस आणि सपोर्ट स्टाफमधील कुणालाही कोरोनाची बाधा होऊ नये,यासाठी युद्धस्तरावर काम सुरू असल्याची माहिती सीएने दिली.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा