
सिडनी कसोटीत पावसाचा व्यत्यय; ऑस्ट्रेलिया एक बाद २१
सिराजनं घेतली पहिली विकेट
आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
सिडनी येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पावासाचा व्यत्यय आल्यामुळे सामना थोडावेळ थांबवण्यात आला आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियानं आपल्या संघात दोन महत्वाचे बदल केले आहेत. मेलबर्नचा पराभव जिव्हारी लागलेल्या ऑस्ट्रेलियाने सिडनीच्या दृष्टीने ७० टक्के तंदुरुस्त वॉर्नरला संघात स्थान दिले आहे. त्याशिवाय युवा फलंदाज पुकोवस्कीनं आपलं कसोटी पदार्पण केलं.
डेव्हिड वॉर्नर आणि पुकोवस्की यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. मात्र नवख्या सिराजच्या गोलंदाजीवर पुजाराकडे झेल देत वॉर्नर स्वस्तात बाद झाला. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तोपर्यंत ऑस्ट्रेलियानं ७.१ षटकानंतर एक गड्याच्या मोबदल्यात २१ धावा केल्या आहेत. भारताकडून सिराजनं यशस्वी गोलंदाज ठरला आहे. मार्नस लाबुशेन (२*) आणि पुकोवस्की (१४*) खेळत आहेत. पावसामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला आहे. लंचनंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे.
Update: Rain halts play in the first session on Day 1 of the 3rd Test.
AUS 21-1 after 7.1 overs. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/grxRJlvZB9— BCCI (@BCCI) January 7, 2021
रोहितचं पुनरागमन, सैनीचे पदार्पण
सिडनीत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतील विजयासह नव्या वर्षांचा यशस्वी प्रारंभ करण्याचा निर्धार कर्णधार अजिंक्य रहाणेने केला आहे. उमेशच्या जागी वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. रविचंद्रन अश्विनच्या फिरकीचा ऑस्ट्रेलियाने धसका घेतला असून, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांच्यासारख्या दर्जेदार फलंदाजांनाही अश्विनने तंबूची वाट दाखवून दरारा निर्माण केला. जसप्रीत बुमराह वेगवान माऱ्याचे आत्मविश्वासाने नेतृत्व करीत आहे. त्याच्या साथीला सिडनीत सैनी आणि मोहम्मद सिराज हे युवा गोलंदाज असतील.
ऑस्ट्रेलिाच्या संघात दोन बदल –
दुसऱ्या कसोटीत झालेल्या पराभवनंतर ऑस्ट्रेलिया संघाने दोन बदल केले आहेत. जो बर्न्स आणि ट्रेव्हिस हेड यांना आराम देण्यात आला आहे. तर डेव्हिड वॉर्नर आणि युवा फलंदाज पुकोवस्की यांना अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे.
जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.