खुंटाळावाशियानी पकडले दोन अवैध रेतीतस्करांचे अवैध ट्रॅकटर

ट्रेकटर तहसील कार्यालयात केले जमा

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

39

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

प्रतिनिधी नेरी

नेरी वरून जवळ असलेल्या खुंटाला येथील नागरिकांनी अवैध रेती भरून जात असलेल्या दोन ट्रकटर ला अडवून गावात रोखून ठेवले आणि महसूल विभागाला माहिती देऊन त्या ट्रकटर वर कारवाई करायला लावून तहसील कार्यालयात जमा करायला लावून अवैध रेतीतस्करांच्या मुसक्या आवळल्या
सदर असे की मागील 4 महिन्यापासून खुंटाला गावापासून जवळ असलेल्या गोरवट घाटावर अवैध रेतीतस्करांचे धुमाकूळ सुरू असून लपूनछपून रेतीतस्करी सुरू होती मागील अनेक दिवसांपासून खुंटाला येथील नागरिक रेतीतस्करी ला आला घालण्याच्या प्रयत्नात होते परंतु यश आले नाही परंतु आज सकाळी च्या दरम्यान गावकऱ्यांना माहिती मिळाली की दोन ट्रकटर गोरवट घाटावर रेतीतस्करी साठी आले आहेत लगेच गावकऱ्यांनी गावाजवळील मार्गावर सापळा रचून अनेक नागरिकांच्या उपस्थितीत दोन रेतीभरून असलेल्या ट्रेकटरला अडविले आणि महसूल विभागला माहिती देऊन कारवाई करण्यासाठी बोलविले सदर ट्रकटर वर कुठलाही नंबर नसून दोन्ही ट्रकटर बिना नंबरचे आहेत त्यामुळे हे ट्रकटर कोणाच्या मालकी चे आहेत हे कळू शकते नाही सदर माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी खुंटाला येथे दाखल झाले यात नायब तहसीलदार कोवे साहेब महसूल अधिकारी हजारे साहेब तलाठी निखाडे उपस्थित झाले सदर ट्रकटर मधील रेतीचा पंचनामा करीत दोन्ही ट्रेकटरवर कारवाई करीत तहसील कार्यालय चिमूर येथे पाठविण्यात आले

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा