सॅमसंग-अ‍ॅपल नाही तर ‘हा’ ठरला भारताचा सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन ब्रँड !

अन्य सर्व कंपन्यांवर केली मात...

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

75

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

जर तुमच्याकडेही ‘शाओमी’चा स्मार्टफोन किंवा अन्य प्रोडक्ट असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. अन्य सर्व कंपन्यांवर मात करत Mi India स्मार्टफोनच्या बाबतीत भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड ठरला आहे. याशिवाय अन्य प्रोडक्ट्सच्या बाबतीतही एमआय इंडिया ब्रँड दुसऱ्या क्रमांकावरील विश्वसार्ह ब्रँड आहे. तर, Dell सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड ठरला आहे.

TRA ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट 2020 मधून ही माहिती समोर आली आहे. TRA Brand Trust Report 2020 साठी 8,000 ब्रँड्स, देशातील 16 शहरांचा अभ्यास करण्यात आला. सर्व्हेनंतर टीआरएने एमआय इंडियाची भारतातील सर्वात विश्वसनीय स्मार्टफोन ब्रँड म्हणून घोषणा केली. विश्वास एका दिवसात नाही संपादन करता येत…त्यासाठी दीर्घ कालावधी लागतो… आमच्या ग्राहकांना बेस्ट क्वालिटी आणि अनोखे प्रोडक्ट्स देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिलाय…सहा वर्षापासून जास्त काळापासून आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभारी आहोत अशी प्रतिक्रिया मनू कुमार जैन यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

TRA रिसर्च एक ‘कंज्युमर ब्रँड इनसाइट अँड ब्रँड अ‍ॅनालिटिक्स’ कंपनी आहे. लोकांची आवड आणि एखाद्या प्रोडक्टबाबत त्यांचा दृष्टीकोन यावर ही कंपनी रिसर्च करते.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा