लग्नासाठी मुली दाखवून फसवणूक; टोळी गजाआड

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

19

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

अकोला : उपवर युवकांना सुंदर मुली दाखवून त्या मोबदल्यात लाखोंची रक्कम उकळणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात डाबकी रोड पोलिसांना शनिवारी यश आले, जळगाव, खान्देश आणि नंदुरबार येथील दोन युवकांना तब्बल एक लाख ८० हजार रुपयांना या टोळीने गंडविले होते.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांघरी नवघरे येथील सुदाम तुळशीराम करवते ऊर्फ योगेश मूळ नाव गुलाब नारायण ठाकरे हा या टोळीचा म्होरक्या आहे. त्याचे साथीदार शंकर बाळू सोळंके (रा. सातमैल, वाशिम रोड, अकोला), संतोष ऊर्फ गोंडू सीताराम गुडधे (रा. आगीखेड, ता. पातूर), हरसिंग ओंकार सोळंके (रा. चांदूर, ता. अकोला) या तिघांसह जळगाव, खान्देश व अकोला येथील दोन महिला अशा पाच जणांना अटक केली.

करमूड (ता.चाळीसगाव, जि. जळगाव) येथील अतुल ज्ञानेश्वर सोनवणे पाटील या उपवर युवकास अकोल्यातील या पाच जणांच्या टोळीने सुंदर मुलींचे फोटो पाठविले व लग्नाचे आमिष दिले. त्या बदल्यात अतुल पाटील यांना दीड लाख रुपयांची मागणी केली. मात्र, पाटील यांनी २० हजारांची रक्कम देऊन मुलगी दाखविण्याची मागणी केली. टोळीने मुलगी दाखवली पण लग्न लावून देण्यास टाळाटाळ केल्याने अतुल पाटील यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

असाच प्रकार वडाळी (ता. शहादा, जि. नंदुरबार) राहुल विजय पाटील यांच्यासोबतही घडला. पातूर येथील सुदाम तुळशीराम करवते ऊर्फ योगेश याने राहुलला काही मुलींचे फोटो पाठविले. त्यापैकी एक मुलगी पसंत येताच मुलीच्या वडिलांना एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसोबत लग्न करून तिला घेऊन जा, असे सांगितले.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा