वाघाच्या हल्यात गुरे चारनारा जखमी

- पिपर्डा येथील घटना

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

22

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

चिमूर :  चिमूर तालुक्यातील पिपर्डा येथील गुराखी स्वतः च्या चार ते पाच गाई चारण्यासाठी गाडी तलावाजवळ गेला असता अचानक वाघाने गाईवर हमला केला गाई वाघाच्या तावडीतुन सोडविन्यासाठी गेला असता वाघाने गाई ला सोडून गुराख्यावर हल्ला केला यात गुरुखी जखमी झाला हि घटना मंगळवारला दिड वाजताच्या सुमारास घडली जखमी गुराख्याचे नाव रमेश पांडुरंग फुलबांधे वय ५२ वर्ष पिपर्डा येथील रहीवासी आहे
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव वनपरिक्षेत्र (बफर झोन) अंतर्गत येनाऱ्या पिपर्डा येथील गुराखी रमेश नेहमी प्रमाने स्वताच्या पाच सहा गाई जंगलात चारायला गेला असता अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने गाईवर हल्ला केला सदर घटना कक्ष क्रमांक ५६१ गाडी तलाव जवळ घडली हे दृष्य रमेश ला दिसताच वाघाच्या हल्यातुन गाईला काठीच्या सहायाने सोडविन्याचा प्रयत्न करीत असतानाच वाघाने गाईला सोडुन गुराखी रमेश वर हल्ला चढवीला यात वाघाने रमेशच्या छातीवर पंजा मारल्याने गुराखी जखमी झाला मात्र वाघ व रमेश च्या झुंझीतुन वाघाला पिटाळून लावन्यात रमेश ला यश आले यात मात्र रमेश जखमी झाला

सदर घटना गावकर्यांना माहीत होताच गावकऱ्यांनी जंगलात गेले व या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता वनविभागाच्या कर्मचार्यांनी गुराखी रमेश फुलबांधे याला उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जखमी गुराख्यावर उपचार सुरु आहेत वनविभाने तातळीची मदत तिन हजार रुपये दिली मदत देताना पिपर्डा बिटाचे क्षेत्र सहायक पि एम सुरजागडे व वन कर्मचारी उपस्थीत होते

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा