Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयात दगावलेल्या बाळांच्या आईची भोजापूर इथं जात भेट घेतली.

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

4

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

भंडारा: जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयात दगावलेल्या बाळांच्या आईची भोजापूर इथं जात भेट घेतली. त्यावेळी आपण हात जोडून उभं राहण्यापलीकडे काही करु शकलो नाही, अशी खंतही ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.(Uddhav Thackeray’s visit to Bhandara District Hospital)

पीडित कुटुंबियांचं सांत्वन करुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “ही दुर्घटना आम्ही गांभीर्यानं घेतली आहे. मी, विधानसभा अध्यक्ष आणि मंत्री येथे आलो आहोत. पीडित कुटुंबासमोर हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडं पर्याय नव्हता. कोरोनाचा सामना करताना इतर गोष्टींकडे डोळेझाक केली गेली का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची चौकशी केली जाईल. जे काही सत्य आहे ते बाहेर येईल या घटनेला जो जबाबदार असेल तो सुटणार नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

चौकशी समिती गठीत – मुख्यमंत्री

तसंच भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. विभागीय आयुक्तांना त्याबाबत आदेश दिले आहेत. मुंबईतून अग्निशमन दलाचे प्रमुख राम दळे त्यांचीही नेमणुक या टीममध्ये करण्यात आली आहे, कुठेही कसर राहणार नाही, सत्या पुढे येईल आणि त्यात जर कुणी जबाबदार आढळून आलं तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर या दुर्घटनेनंतर राज्यात पुन्हा अशी दु:खद घटना घडू नये यासाठी राज्यातील सर्वच रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे आदेश दिल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- फडणवीस

भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाल्यांनतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत त्याची तत्काळ चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केली आहे. तसंच या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेली ही दुर्घटना म्हणजे महाराष्ट्रासाठी काळा दिवस असल्याचंही फडणवीस म्हणाले होते.

..तर ती बाळं वाचली असती!

भंडारा जिल्हा रुग्णालयात फायर सेफ्टी उपकरणांबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पण त्याबाबत गेल्या 6 ते 7 महिन्यांत आरोग्य विभागाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. जर याबाबत योग्य वेळी निर्णय झाला असता आणि रुग्णालयात फायर सेफ्टी उपकरणं बसवण्यात आली असती तर त्या 10 चिमुकल्यांचा जीव वाचले असते, असं मत विविध स्तरातून व्यक्त केलं जात आहे.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा