अवैध छुप्या मार्गाने रेतीचा उपसा सुरुच, शासनाला लाखोंचा चुना!

रेती तस्कर मस्त आणि अधिकारी बसलेत सुस्त

रात्रीला डोळेफोडुन कारवाई करणारे अधिकारी कुठे

राहुल उके अमरावती :-
धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाळुची सुसाट वाहने नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. अवजड वाहतुकिस बंदी असतांना पोलीसांचा वचक न राहिल्याने ओव्हरलोड डंपर ट्रक बाजारपेठेतुनच वापरतात. वाळु वाहने नागरिकांच्या जिवावर उठल्यामुळे प्रशासनाने उशिरा का होईना पोलीस, आरटीओ विभागाला जोडीला घेत संयुक्त कारवाईचे अस्त्र उपसले. मात्र कारवाईला उतरलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी तालुक्यात कारवाया केल्याने स्थानिक अधिकाऱ्यांना प्रकार दिसत नव्हता का असा सवाल वरिष्ठ अधिकारी संबंधितांना विचारताहेत.
धामणगांव तालुक्यात नायगांव, गोकुळसरा, सोनोरा, आष्टा, ओकनाथ अधिकतर रेती घाट आहेत. यावर्षी मोजकेच रेतीघाट हर्रास झाले असतांना तुर्तास बंद सुध्दा झालेत पण रेती वाहतुकीचे सत्र सुरुच आहेत. तालुक्यातील काही रेती तस्कर तहसिलदार सारख्या अधिकाऱ्यांना पाठीसी धरुन तर त्यांच्या जाण्यायेण्याच्या रेल्वेच्या टिकीटापासुनचा खर्च उचलुन त्यांच्या सेवेत सक्रिय असल्याने अधिकारी सुस्त होवुन रेती तस्करांचे चांगलेच फावत आहेत. मागिल काळात अधिकाऱ्यांनी रात्रीला धाडसी कारवाई करुन आपली कर्तव्यदक्षांची छाप तालुक्यातील नागरिकांसमोर ठेवली होती मात्र काहीच दिवसातच अधिकाऱ्यांचे खरे चेहरे पुढे आले आहे. महीन्याकाही पगारापेक्षा 3 पट महसुल हा स्वत:च्या घशात उतरत असल्याने कारवाईचा बडगा अधिकारी पुकारत नसल्याचे वास्तव समोर आहेत ते थातुरमातुर कारवाई करुन गब्बर बनले आहेत.

-तालुक्यात शासनाला लाखोचा चुना
फक्त अधिकाऱ्यांच्या चाफलुशीने लगत आहेत. तिन महिन्याअगोदर रात्रीला रेती तस्करावंर कारवाई करण्यात आली. बिना रॉयल्टी व ओव्हरलोड वाहतुक अशा एकुण 13 गाडया तहसिल कार्यालयात जमा करण्यात आल्या मात्र दोन दिवसानंतरचा अहवाल हा फक्त 12 गाडयाचांच बनला असल्याने तहसिलदारांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे झाले होते ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच तहसिलदार स्व्त: तस्करांना भ्रमणध्वनीव्दारा संपर्क करुन बातचित करुन त्या अवैघ साठा असलेल्या गाडयावर कारवाई करतात. यासाठी तहसिलदारांकडे कोरा चेक काही रेती माफिया सोडुन जात असल्याचे भयाण चित्र समोर होते. अधिकाऱ्यांची साठगाठ असल्याशिवाय कोणताही अवैध व्यवसाय करणारा व्यक्ती हिंमत ठेवु शकत नाही त्याला पाठबळ देणारे अधिकारीच असतात म्हणुन लाखोचा चुना शासनाला तस्करांमुळे नसुन अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे बसत आहे.

अधिकाऱ्यांना मलीदा पोहचणारे दलाल तालुक्यात सक्रिय

तालुक्यात अवैध व्यवसाय करणारे अधिकाऱ्यांना मलीदा पोहचविण्यासाठी मार्ग शोधत असतांना चार दलाल तालुक्यात सक्रिय होवुन अधिकारी सुध्दा त्यांच्या माध्यमातुनच काम करत असल्याने तस्करांना दलालामार्फतच जावे लागते. हे दलाल संबंधित कार्यालयाच्या गरुडासारख्या चकरा करितच असतात. आपला आव डाव व संधीसाधुपणा काढुन ते अधिकाऱ्यांच्या जवळीक राहण्यात मस्त असतात. दलाल अधिकाऱ्यांच्या जवळीक बाबी सांगुन काम कोणतेही असले तरी आपणच करुन देवु शकतो असा दावा बाहेर बोलतात.

-बनावट रॉयल्टी पासेसवर सुध्दा वाहतुक सुरुच

तालुक्यातील रेती घाट अवैधरित्या सुरु असल्याने त्यांना दरवाजा, नियम, या गोष्टीची आवश्यकता नसते त्यांच्यासाठी शासनाचा महसुल बुडविणे अगदी सोपी पध्दत असते. यातच रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने अवैधरित्या वाहतुक करणारे दररोज 50 ट्रक शहरात प्रवेश करतात. यावेळी काही ट्रक बनावट रॉयल्टी पासेस वर वाहतुक करतांना आढळुन आलेले आहेत. तर तालुक्यात बऱ्यांच ठिकाणी रेतीची मोठया प्रमाणात साठवणुक केल्याचे दिसुन आलेले आहेत. ही साठवणुक एखाघा शासकिय ठिकाणी कामकाज सुरु असेल त्याच ठिकाणी केली जात असल्याचे वास्तव्य आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यावर कारवाई होते मात्र य्थानिक अधिरकाऱ्यांना लक्षात का येत नाही हा प्रश्न आता वरिष्ठांना पडला असतांना अशा संधी साधु अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा