कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांन साठी युवा स्वाभिमानचा आमदार रविभाऊ राणा यांच्या नेतृत्वात हल्लाबोल!

राहुल उके अमरावती :-कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे आज दि.2-5-2018 रोजी 1 वाजता
मा.आ.रविभाऊ राणा यांच्या नेतृत्वात नाफेड विरोधात तुर खरेदी प्रकरणा बद्दल शेतकऱ्यांच्या मालाची ताबडोब खरेदी करण्यासाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले त्या नुसार कृ .उ. ब .स .नाफेड व खरेदी विक्री ला 4 गोडाउनची व्यवस्था आमदार रविभाऊ राणा यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना सांगून ताबडतोब करुण दिली आतापर्यंत 8557 शेतकऱ्यांनी तुर खरेदी साठी ऑनलाइन नोंदणी केली परन्तु 4 महिन्यात 1847 शेतकऱ्यांना बोलावले अजूनही 6710 शेतकरयाची खरेदी होने बाकी आहे आणि तुर खरेदी करने फक्त 15/ 5/ 2018 पर्यन्तच आहे व दररोज फक्त 10 ते 12 शेतकऱ्यांना नफेड बोलावत आहे त्यामुळे ही तूर केव्हा पर्यंत खरेदी करणार हेसुद्धा स्पष्ट नाही तसेच जवळपास 35 कोटी रुपये शेतकऱ्यांचे बाकी आहे आणि फक्त 8 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले उर्वरित पैश्याकरिता शेतकऱ्यांना 2 महिने होऊनही पैसे मिळत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून त्यामुळे आमदार रविभाऊ राणा यांनी तातडीने apmc गाठून हल्लाबोल आंदोलन करून संबधित जिल्हा पुरवठा अधिकारी टाकसाळे , नाफेड चे Dmo पाटिल ,देशमुख, खरेदी विक्रिचे रोहनकर apmc चे राजेश इंगोले , ग्रेडर, मोंढे ,चांगोळे, इत्यादी संबंधीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले व उद्या पासून तातडीने 40 काटे लावून सर्व शेतकऱ्यांना न्याय देऊ असे सर्वांन समोर सांगितले त्यावेळी आमदार रविभाऊ राणा यांच्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वीकृत, संचालक विनोद गुहे , संचालक, मिलिंद भाऊ तायडे, विकास पाटील इंगोले प्रकाश भाऊ कालबांडे, सतीशभाऊ अटल, जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ रोडगे, मंगेश पाटील इंगोले, जीतूभाऊ दुधाने , शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे , मनपा सभापती सुमतीताई ढोके,अनुप अग्रवाल , सतीश मंत्री मिलिंद अवघड, शफी भाई बंडू डकरे जिप सदस्य दिनेश टेकाम इत्यादी शेतकरी ,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

या बातमीवर तुमची कमेंट लिहा