पाटबंधारे विभागाच्या रेकॉर्ड रुमला भीषण आग; कागदपत्रे जळून खाक!

राहुल उके अमरावती – शहरातील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या रेकॉर्ड रुमला आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत उर्ध्व वर्धा धरण विभागाची महत्वाची कागदपत्रे व फर्निचर जळून खाक झाले आहे. ही रेकॉर्ड रुम शहरातील कॅम्प परिसरात आहे.
रेकॉर्ड रुमला लागलेली आग
कॅम्प परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रेकॉर्ड रुमला आग लागल्याचे लक्षात आले. याबाबतची माहिती नागरिकांनी त्वरीत गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी आगीच्या घटनेची माहिती कळविल्यांतर घटनास्थळी अग्निशमक दल पोहोचले. मात्र तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते. यावेळी तेथील सर्व महत्वाची कागदपत्रे, फाईल, लाकडी फर्निचर, कपाट जळून खाक झाले. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रेकॉर्ड रुममधील फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा