अमरावतीत विदर्भ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी 13 कोटींची तरतूद ; विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील!

राहुल उके अमरावती, दि. 9 : राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताची काळजी घेणारा व विकासाची ग्वाही देणारा आहे. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात अद्ययावत स्पर्धा परीक्षा केंद्र, संत्रा उत्पादकांसाठी व शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात असून, हा अर्थसंकल्प विदर्भासह राज्यातील प्रत्येक भागाला न्याय देणारा आहे. अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज व्यक्त केली.
सर्वांगीण विकासाची ग्वाही देणा-या अर्थसंकल्पाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, विदर्भ महाविद्यालय येथे अद्ययावत स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी 13 कोटींच्या तरतूदीमुळे विदर्भातील तरुणांना उत्तम दर्जाचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात विदर्भातून अनेक सनदी अधिकारी घडतील. विदर्भातील अमरावतीसह संत्रा उत्पादक जिल्ह्यांसाठी 15 कोटी तरतूद करण्यात आली आहे. तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील गावांमध्ये स्वस्त धान्य वितरणासह विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. शासन ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे प्रत्यंतर या अर्थसंकल्पातून येते, असेही श्री. पोटे-पाटील यांनी सांगितले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा