अमरावती आगार क्र1 मध्ये जागतीक महिला दिन उत्साहात साजरा!

अमरावती विभागातील महिला दिनाचा कार्यक्रम

राहुल उके (अमरावती): ८ मार्च जागतिक महिला दिना च्या पर्वावर अमरावती आगारात कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात अाला
कार्यक्रमाचे अध्यक्ष वनिता सौदागरे मॅडम उध्घाटक विभाग नियंत्रक गभने साहेब ,प्रमुख पाहुने सौ मनिषाताई ठंभरे,सुचिता बर्वै,इंगळे मॅडम विशेष अतिथि अलका तालनकर होते
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ,क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, पुन्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच अनेक मातृभूमीच्या कर्मठ मातृत्चाला नमन करुन पुजन माल्यार्पन ,व दिप प्रज्वलन सोहळा मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला .
“इतनी शक्ति हमे देना दाता ” या गिताचे सामुहिक रित्या गायन करुन सत्य ,न्याय ,प्रेम ,अहिंसेच्या मार्गाचे सदैव बळ द्या अशी परमेश्वरी प्रर्थना करण्यात आली.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले हळदी कुंकू कार्यक्रम तसेच सर्व महिला भगिनींना गुलाब पुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा,आणि स्वागत करण्यात आले.अमरावती जिल्हातिल पहिली महिला रिक्षा चालक शबाना परविन यांचा सत्कार करण्यात आला त्यांची संघर्ष गाथा आणि बुलंद हौसला ऐकून महिला प्रेरणेनी गदगद झाल्या.
अलका ताजनकर सुमधुर गीतांच्या व गमतिदार कवितांच्या माध्यमातून महिलांना मंत्रमुग्ध व हास्य लोटपोट केले.
मान्यवरांनी महिला दिनाचे अनेक महत्व महिलांना सांगितले महिलांनी महिलांच्या प्रगतीत हातभार लावण्याकरिता पुढे यावे एकजुटिचि मशाल हातात घेऊन लढावे, म्हणजेच प्रेम आणि आपुलकी, एकोपा निर्माण होतो महिला सशक्तिकरणासाठीअनेक नियम कायदे बनले महिलांच्या हितास्तव ते कागदावरच न राहता प्रत्यक्षात अंबलात आनावे त्याचा उपयोग करावा कुठलाही भेदभाव न ठेवता समाज सुसंस्कृत करण्यासाठी लढा द्यावा ,छोट्या छोट्या गोष्टीतून समाजकार्य करावे घर, गट ,गाव ,नगर ,शहर, राज्य, देश संस्कार वान करण्यात महिलांची भुमिका अाग्रहि राहिल त्याकरिता स्वतः पासून चांगुलपणाची सुरूवात करावी महिलांनी महिलांचा गौरव करावा कौतुक करावे एकमेकिंना लढ्यात मदत करावी म्हणजेच समाज बाध्य होईल जग सलाम करेल असे अनेक मार्गदर्शन मान्यवरांनी केले आणि आगारातिल महिलांचे तोंडभरुन कौतुक केले. सकाळपासून नोकरी करुन कार्यक्रमात रस घेता ,महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करता मातृभूमीच्या कर्मठ मातृत्वाची पूजा अर्चना करता त्यामुळे तुम्हा सर्व कष्टकरी महिलांना सलाम असे तोंडभर कौतुक अध्यक्ष सौ सोदागरे मॅडम नी केले
महिलादिनि सौ सारिका चिंचे दर्यापुर आगार ,अरूणा गर्जे वि. कार्यशाळा गवई मॅडम बडनेरा आगार सरिता गजभिये वि. कार्यशाळा यांनी खूप छान विचार मांडले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु शितल मोहोड मॅडम नी केले सौ सुनंदा सरोदे यांनी प्रस्तावना दिली कु मालवनकर यांनी आभारप्रदर्शन केले
अल्पोहाराच्या कार्यक्रमानंतर निरोप समारंभ घेण्यात आला
कार्यक्रम यशस्वी करण्यामागे
सर्व महिलांनी मोलाची साथ दिली तसेच आगारातिल बंधूंनी सहकार्य केले

या बातमीवर तुमची कमेंट लिहा