राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चिमूर तालुका व शहर कार्यकारणी जाहीर

जय विदर्भ न्यूज

निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी :

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका चिमूर चे संघटनात्मक बांधणी करून पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचे विचार पोहचविण्यासाठी व राजकारण सोबत सामाजिक दायित्व करून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर चे डी के आरीकर व चिमूर विधान सभा अध्यक्ष सुरेश राम गुंडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शहर कार्यकरणीत शहर अध्यक्ष रामदास ठुसेउपाध्यक्ष अतुल वाकडे, उपाध्यक्ष संदीप रोकडे, कोशाध्यक्ष वैभव पत रंगे ,सरचिटणीस निलेश कुरडकर, चिटणीस प्रवीण राऊत सचिव गोविंदा म्हसकर, यांची निवड करण्यात आली. तालुका कार्यकरणीत तालुका अध्यक्ष योगेश ठुने , उपाध्यक्ष योगेश वानखेडे, अनिल रामटेके, कोंषध्यक्ष सुधीर मांडवकर, सरचिटणीस अशोक शंभरकर,सचिव सुधाकर हनवते, सहसचिव संजय रामटेके, संघटक सुधीर कोतरांगे, अमित शंभरकर, चंद्रभान सावसाकडे, गनेश चौधरी, प्रशांत टोहोकर आदी निवड करण्यात आली. चिमूर विधामसभा प्रतिनिधी म्हणून रमेश खेरे, राजू मुरकुटे, रामभाऊ चौधरी, मनिषा ननावरे, अशोक शंभरकर, राजू चौखे ची सुद्धा निवड करण्यात आली असून कार्यकारणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती रा. कॉ तालुका अध्यक्ष योगेश ठुने यांनी दिली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा