‘महाराष्ट्रात मराठी, देशात हिंदीही संकटात’ ; २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनी चिमूरच्या श्रीहरी बालाजी मंदीर सभागृहात शिक्षक कवींचे संमेलन!

जय विदर्भ न्यूज

निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी :

आयसीएसई बोर्डाच्या भाषा विकल्पाच्या नव्या धोरणामुळे या शाळांमधून मराठी आणि हिंदी सह सर्वच प्रादेशिक भाषा हद्दपार होण्याचं संकट निर्माण झालं आहे. या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारती आणि शिक्षक साहित्य संमेलन संस्थेने २१ फेब्रुवारी (आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन) ते २७ फेब्रुवारी (मराठी राजभाषा दिन) या सप्ताहात भाषा बचाव मोहीम सुरु केली आहे. कवी कुसुमाग्रज दिनी २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वा.चिमूर येथील श्रीहरी बालाजी मंदिर सभागृहात शिक्षक कवींचं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे, अशी माहिती कवी संमेलनाचे संयोजक सुरेश डांगे,शिक्षक भारतीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रविंद्र उरकुडे यांनी पत्रकात दिली आहे.
या कवी संमेलनाला अनेक मान्यवर कवीही हजेरी लावणार आहेत. ‘माझ्या भाषेसाठी, माझी कविता’, या संकल्पनेवर शिक्षक कवींनी आपली कविता एका छोट्या पोस्टरवर लिहून आणून श्रीहरी बालाजी मंदिर सभागृह परिसरात प्रदर्शित करावी, असे आवाहन रविंद्र उरकुडे, सुरेश डांगे,निर्मला सोनवने,नंदकिशोर शेरकी,माधुरी पोंगळे यांनी केले आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा