अखेर ‘त्या’ वाघाचा उपचाराविनाच म्रुत्यू – वाघाला वाचवण्यासाठी सरकारने केलेला खर्च व्यर्थ!

जय विदर्भ न्यूज

निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी :

ताडोबा व्याघ्र प्रकल्प मधील मोहुर्ली येथील ‘येडा अण्णा’ नामक वाघ हा भांसुली परिसरात आल्यावर तलावा जवळ वास्तव्याने राहत असल्याने वन विभागाने पकडण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आजाराने आज २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा दरम्यान त्याचा मृत्यू झाला . वन विभागाच्या वतीने पंचनामा करून त्याचे दहन करण्यात आले .
भांसुली परिसरातील जंगलात ‘येडा अण्णा’ नामक वाघ असल्याने नागरिकांत भीती चे वातावरण पसरले होते. वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी २१ फेब्रुवारी पासून प्रयत्न केले . परंतु चार दिवस झाले असताना वाघाला पकडण्यात वन विभागाला अपयश आले येडा अण्णा नामक वाघ हा आजारी होता. पकडण्यासाठी बकरा ठेवण्यात आले असताना वाघाने बकऱ्याकडे सुद्धा ढुंकुंन पहिले नाही . अखेर आक २५ फेब्रुवारी रोजी दु २ वा दरम्यान वाघा ने आपला प्राण सोडला. भांसुली येथून खडसंगी येथील वन विभाग च्या विश्राम गृह परिसरात शव विच्छेदन करून दहन करण्यात आले . यावेळी वन विभागाचे एसीफ गजेंद्र हिरे, एसीफ आर एम वाकडे, मानद वन्य जीव बंडू धोत्रे आर एफ ओ भाविक चिवडे, वन्य जीव मित्र अमोद गौरकर चिमूर पोलीस स्टेसन चे ठाणेदार दिनेश लबडे व इतर वन कर्मचारी उपस्थित होते.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा