धामणगाव बडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अजब प्रकार; कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रियासाठी केली दीड हजाराची मागणी!

कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रियासाठी केली दीड हजाराची मागणी तालुका आरोग्य अधिकारी कडे तक्रार दाखल

मोताळा:- देशाच्या लोकसंख्येत समतोल रहावा या साठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी या साठी मोठ्या प्रमाणात जाहिराती व अन्य माध्यमातून जन जागृती करून मोठ्या प्रमाणत यांच्या गाजा-वाजा केला जातो यावर लाखो रुपयांची उधळण केली जाते कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ६०० मदत देण्यात येते असे सर्व असताना सुद्धा या ला मोताळा तालुका हा अपवाद ठरला आहे मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी चक्क दीड हजार रुपयांची मागणी डॉकटर कडून करण्यात आल्याची गँभीर घटना घडली आहे
या बाबत अधिक वृत्त असे की मोताळा तालुक्यातच नलकुंड येथील रहिवासी यांनी आपली पत्नी सौ सोनु ईश्वर चव्हाण यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळील असलेल्या धामणगाव बडे आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करण्यासाठी भरती करण्यात आली व शस्त्रक्रिया करण्या अगोदर आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या चाचण्या ही करण्यात आल्या मात्र शस्त्रक्रिया करण्या आधी ईश्वर चव्हाण यांना दीड हजार रुपयांची मागणी डॉकटर कडून करण्यात आली व ही मागणी पुर्ण न केल्यास शस्त्रक्रिया न करण्याचा दम ही धामणगाव बडे येथील डॉक्टर यांनी चव्हाण यांना दिला आपली हलाक्याची परिस्तिथी असल्यामुळे चव्हाण कुटूंबियांना शस्त्रक्रिया विनाच आरोग्य केंद्रातून बाहेर काढून देण्यात आले
या प्रकरणातील दोषी डॉकटर वर कारवाई करण्यात यावी व प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये कोणत्याही गोर गरीबा वर अत्याचार होऊन नये व त्याला कोणत्याही प्रकारच्या उपचारा विनाच तो बाहेर पडू नये या करिता गोर सेना तालुका अध्यक्ष ईश्वर चव्हाण यांनी मोताळा तालुका आरोग्य अधिकारी तक्रार दाखल केली असुन धामणगाव बडे आरोग्य केंद्रा मध्ये नलकुंड गावातील ३-४ महिलांच्या करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया अयशस्वी झाले असल्याची माहिती त्यांनी आपल्या तक्रारी मध्ये केली आहे या तक्रारींवर सरपंच डिंगाबर चव्हाण गोर सेना तालुका अध्यक्ष ईश्वर चव्हाण,उपसरपंच दिनकर पवार,पंडीत जाधव,देविदास चव्हाण,इंदल राठोड,भीमराव चव्हाण,विजय चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

या बातमीवर तुमची कमेंट लिहा