गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला काँग्रेसची काटे कि टक्कर

अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला काँग्रेस कडुन कडवी टक्कर मिळाली आहे. गुजरात विधानसभेच्या शेवटच्या निकालाची आकडेवारी नुसार भारतीय जनता पक्षाला ९९ जागा मिळाल्या आहेत तर कोंग्रेसने ८० जांगावर मजल मारली आहे. तर तीन अपक्षानीही विजय मिळवला आहे यामध्ये काँग्रेस ला समर्थन असणारे ओबीसी नेते जिग्नेश यांचा समावेश आहे. थोडक्यात या निकालात भाजपचा निसटता विजय झाला आहे. यावरून आता भाजपच्या विजया पेक्षा कोंग्रेस च्या वाढलेल्या जागांचीच चर्चा जास्त होणार आहे. या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादि कडून भाजपला चिमटे घ्यायला सुरुवात झाली आहे. असे असले तरी भाजप ने सुटकेचा निश्वास टाकला असल्याचे दिसत आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा