विदर्भ बंदला हिंसक वळण ; नागपुरात बसच्या काचा फोडल्या!

(प्रतिनिधी):- सत्तेवर असलेल्या भाजपच्या राज्य व केंद्र शासनाने निवडणुक पूर्वी विदर्भ राज्य व शेतकरी हिताचे विविध आश्वासने दिले होते. मात्र भाजप सरकारला तीन वर्षांचा कार्यकाळ झाला असून आश्वासने पूर्ण करण्यात आली नाही. म्हणून आज ११ डिसेंबर रोजी विदर्भ बंदची हाक देण्यात आलेली आहे.

वेगळा विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे. मात्र वेळोवेळी सत्तेत येणाऱ्या सत्ताधारी पक्षांनी या मागणीला हेतू परस्पर दुर्लक्ष केले आहे. संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा विकास खुंटलेला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास अनेक विकासकामांना वेग मिळणार, विदर्भात वीज उत्पादनात परिपूर्ण असतांनाही येथील नागरिक व शेतकरी वीज खंडितेच सामना नेहमी करावा लागतो वेगळा, आर्थिक दृष्ट्या सुद्धा विदर्भ सक्षम होत निधी व वनकायद्यामुळे रखडलेल्या अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागणार, आज ११ डिसेंबरला विदर्भ बंद मध्ये अनेक विदर्भातील विदर्भ वेगळा समितीने बंदचा आव्हान केला आहे. यातच आज नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या

दिवशी नागपुरातील अनेक भागात विदर्भ राज्य आंदोलन समितीने आणि अन्य विदर्भवादी संघटनांनी आज नागपुरात अनेक ठिकाणी टायर जाळून आणि बसवर दगडफेक करून या आंदोलनाला हिंसक वळण आली आहे. त्यामुळे विदर्भ बंद आणि हिवाळी अधिवेशन यादरम्यान पोलीस प्रशासन कसे हि परिस्थिती हाताळणार हे पाहण्यासारखे असेल. आणि आजच्या विदर्भ बंदचे हिवाळी अधिवेशनात नेमके काय निकाल निघणार याकडे सम्पूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा