शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उद्या विदर्भ बंद

खामगांव: उद्यापासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे त्या पार्श्वभूमीवर विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने वेगळ्या विदर्भाच्या मागणी साठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी, 11 डिसेंबररोजी विदर्भ बंदची हाक दिली आहे. या बंद मध्ये जिल्हा वासीयानी सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनिष किरडे यांनी केले आहे.
राज्यातील भाजप सरकार विदर्भातील भरघोस पाठिंबावरच उभे आहे. राज्याचे मुख्यमंत्री व केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक पुर्वीच्या आपल्या भाषणात वेगळा विदर्भ करण्याचे आश्वासन वैदर्भीय जनतेला दिले होते. यामुळे काँग्रेसकडे असलेला विदर्भ जनतेने भाजपच्या पारड्यात दिला. आता मात्र विदर्भाचा मुख्यमंत्री असताना विदर्भाचा विकास खुंटलेला आहे. या नेत्यांनी दिलेली वेगळ्या विदर्भाचा विसर या नेत्यांना पडला आहे. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्याची खुर्चीचा मोह झाल्याचा आरोप जिल्हा सचिव निलेश बढे यांनी यावेळी केला. या नेत्यांच्या मोहात विदर्भातील शेतकरी आत्महत्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्यात राहून विदर्भाचा विकास होणे नाही. विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी आधीच आमचा विदर्भ आम्हाला द्या आमच्या समस्या आम्हीच सोडवु असे आवाहनच राज्य सरकारला केले आहे. या सर्व बाबींवर वैदर्भीय जनतेने जागरूक होवून वेगळ्या विदर्भाची मागणी आणखी प्रभावी करण्यासाठी विदर्भ बंद मध्ये सहभागी होवून शेतकऱ्यांसाठी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवावे असे आवाहन यांनी केले आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा