आता उत्तरप्रदेश मध्ये सुद्धा शिवसेना; उत्तर प्रदेशमधील निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार विजयी !!!

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं परत एकदा आपला झेंडा फडकवला.यावेळीही विरोधी पक्षाचा भाजपने सुफाडा साफ करत मोठा विजय मिळवला. 16 पैकी 14 महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होणार हे जवळपास स्पष्ट झालंय.

उत्तर प्रदेश महापालिकेच्या निवणुकीमध्ये शिवसेनेनंही अलाहाबादमध्ये महापालिकेत आपलं खातं उघडुन सर्वांनाच आश्चर्य धक्का दिला. अलाहाबादच्या 40 नंबरच्या वार्ड मधून सेनेचे उमेदवार दिपेश यादव हे विजयी झालेत.

अलाहाबादमध्ये शिवसेनेनं खातं उघडल्याची माहिती स्वतः आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन दिली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा